महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार;मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस!
राजकारणात सत्तेची खुर्ची अनेकांना लाभते, पण त्या खुर्चीचा मान वाढवणारे नेतृत्व विरळच असतात. काही नेते फक्त पदे भूषवतात, तर काही आपल्या कर्तृत्वाने त्या पदालाच नवी प्रतिष्ठा प्राप्त करून देतात. असेच दूरदृष्टी, अभ्यासपूर्ण निर्णयक्षमता, विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन आपल्या कार्यशैलीने जनतेच्या मनात विश्वासाचे अढळ स्थान निर्माण करणारे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री मान.श्री.देवेंद्रजी फडणवीस…
