आ.दिपक केसरकर;ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहिला
सावंतवाडी प्रतिनिधी
येथील कै.सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक पीएम श्री शाळा सावंतवाडी नंबर २ नूतन इमारत भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, सावंतवाडी नगरपरिषद शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, नगरसेवक देव्या सूर्याजी नगरसेविका दुलारी रांगणेकर, बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष भारती मोरे, केंद्रप्रमुख श्री. ठाकूर , सुरज परब, सामाजिक कार्यकर्ते नंदू गावडे , आबा केसरकर, माजी केंद्र प्रमुख म. ल. देसाई, यांसह पालक अनंत जाधव व इतर पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले की सुधाताई कामत शाळेचा सुंदर इमारत लवकरात लवकर उभी करण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करू. ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. या शाळेच्या प्रगतीसाठी जे जे काही लागेल ते नक्कीच आम्ही करू. सर्वांना दसरा आणि दिवाळीच्या देखील खूप खूप शुभेच्छा! जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले की सुधाताई कामत शाळा नंबर २ ची इमारत बांधण्यात अनेकांचा मौलिक वाटा आहे. या शाळेच्या प्रगतीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सहकार्य करू. अनेकदा या शाळेत मी आलो आहे. या शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा मला नेहमीच अभिमान वाटतो. गुणवत्ता ही वाखाणण्याजोगे असून या शाळेची उत्तम प्रगती होत आहे. या शाळेच्या भौतिक सुविधा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. इमारत ही दर्जेदार उभी राहणार असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कंत्राटदाराने लवकरात लवकर ही इमारत उभी करून आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी केली. जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ म्हणाले की, सुधाताई कामत शाळेचा अभीमान संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातही आहे. या शाळेची गुणवत्ता नेहमीच उत्तम राहिली आहे. लवकरात लवकर ही इमारत उभी राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी देखील मंत्री असताना खूप अभिमानास्पद कार्य केले आहे. यावेळी उपस्थित सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक होण्यासाठी शिक्षण प्रक्रिया खूप महत्वाच्या आहेत. पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव म्हणाल्या की आज सावंतवाडी शहरासाठी ऐतिहासिक व सुवर्ण दिवस उजळला आहे. शिक्षण हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाची बाब आहे. आपल्याला सुजान नागरिक होण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. सुधाताई कामत शाळेला पंचायत समितीच्या वतीने जे जे सहकार्य लागेल ते सर्व करू असे आश्वासन त्यांनी दिले.
