सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक संपन्न..!
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा, सिंधुदुर्गनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारण्याची योजना तसेच आधुनिक व्यापारी संकुल उभारणीचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. या सादरीकरणावर समितीने सूक्ष्म निरीक्षण करत काही आवश्यक बदल सुचवले असून,…
