२ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा:ॲड सुहास सावंत यांची घोषणा
कुडाळ प्रतिनिधी
प्रशासनाने शब्द दिल्याप्रमाणे जुन्या शिवरायांच्या पुतळ्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करून पूर्णाकृती स्मारक केले जात नाही तोपर्यंत जुन्या पुतळ्याला हात लावणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते. त्यातच पूर्वीपासून असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याचे विधिवत विसर्जन करण्या आधीच, जो नवा गटावरील ११००० व्होल्ट एमएसईबी डीपी शेजारी धोकादायक ठिकाणी अयोग्य आणि बेकायदेशीर पणे रात्रीच्या काळोख्या अंधारात काही विकृत प्रवृत्तींनी ठेकेदारांच्या अडचणी दूर करण्यासाठी छत्रपतींचा सौदा करून गटारावर पुतळा आणून ठेवला. आज त्या ठिकाणी बाजू बाजुलाच दोन पुतळे झालेत ही महाराजांची आणि शिवप्रेमींची क्रूर चेष्टा केली आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.
या संदर्भात मराठा महासंघ आणि शिवप्रेमींनी आज सावित्रिलीला मंगल कार्यालय साळगाव येथे बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आणि आपापल्या तीव्र भावना आणि खेद व्यक्त केला,तसेच पुढील लढ्याची रणनीती बाबत चर्चा करून पुढील लढ्याचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार एकमताने ॲड सुहासजी सावंत यांच्याकडे देण्यात आले. ॲड.सावंत पुढील लढ्याविषयी मार्गदर्शन केले आणि २ मार्च २०२६ पासून जुन्या शिवस्मारकाच्या ठिकाणी जोपर्यंत हा विषय कायमस्वरूपी मार्गी लागत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला तसेच उद्या ताबडतोब त्यासंदर्भातले पत्र स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांना देण्याचे ठरले.
त्याचप्रमाणे आर्थिक जोरावर हा प्रकार ज्यांनी घडवून आणल्याचे कानावर आहे त्या संबंधित ठेकेदाररूपी वतनदार आणि बगलबच्चे यांची चौकशी लावण्यासाठी उद्या ताबडतोब कुडाळ तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यासंदर्भात सर्व शिवप्रेमी निवेदन देणार आहेत. तसेच २ मार्चपासून होणाऱ्या आमरण उपोषण आंदोलनाचे नियोजन संदर्भात संपूर्ण दशक्रोशित गाववार नियोजन बैठका घेत भव्य आंदोलन उभारणार असल्याचे ॲड सावंत यांनी जाहीर केले. त्यावेळी विनय गायकवाड, रूपेश बिडये, अनुप नाईक, आरटीआय कार्यकर्ते मनोहरजी येरम, संतोष परब, वैभव जाधव, प्रसाद दळवी समीर पालव, संदीप सावंत, भिकाजी बागवे, वसंत गायकवाड, सूरज घाटकर, वैभव पवार, अमेय धुरी, एकनाथ धुरी, उमेश धुरी, महेश वारंग, विजय नाईक- सरमळकर, मिलिंद नाईक, ओंकार घाटकर, किरण म्हापदी, लक्ष्य शितप इत्यादी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
