कुडाळमध्ये ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न..!

कुडाळ शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने नगरसेवक श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

ही मोहीम शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता ‘राज हॉटेल जवळील अंडरपास’ परिसरात राबवण्यात आली.’ स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ, अभिमान आपला कुडाळ’ हा संदेश देत या मोहिमेअंतर्गत परिसरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. नगरसेवक श्री. मंदार शिरसाट यांच्या या सकारात्मक उपक्रमाला स्थानिक नागरिक, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने श्रमदान केले.

या मोहिमेला नगरसेवक मंदार शिरसाट, बाळा पावसकर, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर, अमित राणे, सागर भोगटे, रोहन शिरसाट, विनय पालकर, शैलेश काळप, रवी राऊळ व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page