दोन दिवसांत शाखा अभियंता हजर न झाल्यास महावितरणला टाळे ठोकणार;पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांचा इशारा
माणगाव खोऱ्यात विजेचा लपंडाव आणि वारेमाप बिलांमुळे नागरिक त्रस्त माणगाव (प्रतिनिधी) माणगाव सब-स्टेशनमध्ये मे महिन्यापासून रिक्त असलेले शाखा अभियंत्याचे पद दोन दिवसांत कायमस्वरूपी भरले नाही, तर महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा आक्रमक इशारा पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी दिला आहे. महावितरण प्रशासनाचा भोंगळ कारभार, विजेचा लपंडाव आणि अदानी मीटरमुळे येणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे माणगाव…
