कुडाळ शहरातील कामे आमदार वैभव नाईक यांनीच केली म्हणुन कुडाळ शहरवासीयांचा आशिर्वाद कायमच;संतोष शिरसाट
कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ शहरातील गरजेची असलेली विकास कामे आमदार वैभव नाईक यांनी पुर्ण केल्यानेच कुडाळ शहरवासीयांचा आशिर्वाद आमदार वैभव नाईक यांना कायमचा आहे असे गौरवोद्गार कुडाळ शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष शिरसाट यांनी काढले, श्री शिरसाट म्हणाले गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला कुडाळ भंगसाळ नदी बंधारा, कुडाळ शहरातील गार्डन, भंडारी समाजाचे भुषण असलेले मच्छींद्रनाथ कांबळी…
