भक्तिमय वातावरणात विधिवत पूजन; यंदा ११ दिवस गणेशोत्सव साजरा होणार
कुडाळ (वाडोस)
भाजपा युवा नेते तथा युवा उद्योजक विशालजी परब यांच्या कुडाळ तालुक्यातील वाडोस येथील निवासस्थानी श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी परब कुटुंबीयांनी भक्तिभावाने श्री गणरायाचे पूजन केले.
यंदाही विशालजी परब यांच्या निवासस्थानी ११ दिवस श्री गणरायाचे पूजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त घरात मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन बाप्पांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन विशालजी परब यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
