कुडाळ/प्रतिनिधी
शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर यांच्या नेतृतवाखाली आज शिवसेना शिष्टमंडळ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेट घेतली व नूतन पोलीस निरीक्षक श्री.रामचंद्र मगदूम यांची भेट घेऊन कुडाळ तालुक्यात होणारे अवैध धंदे मटका, झुगार,गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामुळे तरुण मुले या व्यसनाच्या आहारी जाऊन बेरोजगार होतात,यावर आपण वेळीच निर्बंध घालावेत अशी मागणी यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने केली.यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री. रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर,शिवसेना तालुका संघटक श्री.अनिकेत तेंडुलकर,शिवसेना कुडाळ तालुका संघटक श्री.रमेश हरमलकर,शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. यशवर्धन राणे,शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय भोगटे,शिवसेना प्रवक्ते श्री.रत्नाकर जोशी,शिवसेना उपतालुका संघटक श्री.संजय सावंत,शिवसेना महिला आघाडी तेंडोली महिला आघाडी विभागप्रमुख सौ.शुभांगी तेंडुलकर,शिवसेना उपविभागप्रमुख तथा ज्येष्ठ शिवसैनिक श्री.रामकृष्ण(मामा) गडकरी,श्री.रघुनाथ साधले,श्री. संदीप माळकर,श्री.महादेव तेंडुलकर, गोट्या शिरोडकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ नूतन पोलीस निरीक्षक शराजेंद्र मगदूम यांची घेतली सदिच्छा भेट.
