भंडारी समाजासाठी त्यांनी आश्वासन व्यतिरिक्त काय केले?

कुणाल कीनळेकर;भंडारी समाज भवनासाठी जागेच्या केलेल्या पाहणी नाट्याचं काय झालं हे जाहीर कराव

कुडाळ प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावरच काही तथाकथित समाज पुढाऱ्यांना हाताशी धरून फसव्या घोषणा आणि अमिषा दाखवून भंडारी समाजाकडे मतांचा जोगवा मागण्याचे धंदे सुरू आहेत. भंडारी समाजासाठी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात आश्वासनांव्यतिरिक्त प्रत्यक्षात काय काम केले ते समोरासमोर जाहीर करावे, असे आव्हान मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिले आहे.

गेल्या पंधरा वर्षापासून विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावरच आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी मतदारसंघात असलेली भंडारी समाजाची मतांची ताकद लक्षात येते आणि याचा फायदा निवडणुकीत मिळावा यासाठी कोणा एका आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला समाज पुढारी म्हणून पुढे करत भंडारी समाज आपल्या दावणीला बांधल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. २०१९ च्या तत्कालीन सिंधुदुर्ग पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत केसरकरांनी कुडाळ तहसीलदार परिसरात शासकीय जमिनीत आपल्या तत्कालीन शिवसेना पक्षातील पक्षातील काही भंडारी समाज्याच्या त्या वेळच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भंडारी समाज भवनासाठी जागेच्या केलेल्या पाहणी नाट्याच काय झालं हे जाहीर

करावे.

माझी भंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांच्याकडे विनंती वजा मागणी आहे की अशा पद्धतीने जो कोणी महासंघाच्या कार्यकारणीवर नसताना तसेच भंडारी समाजकार्यात आपले कोणतेही योगदान नसताना केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी तसेच आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी समाजाची भूमिका चुकीच्या पद्धतीने ठरवत असेल, तर त्याल आवर घालावा, असेही श्री. किनळेकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page