विशाल परब:येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्कीच परिवर्तन करतील
सावंतवाडी प्रतिनिधी
जनतेचा व मतदारांचा प्रतिसाद घेता नारायण राणेंचा रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून विजय हा निश्चित आहे., असं विश्वास व्यक्त करत नारायण राणे हे प्रचंड बहुमताने विजय होतील असे मत युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले दरम्यान गेल्या दहा वर्षात विनायक राऊत यांनी विकासाच्या बाबतीत जो छाप पाडायला पाहिजे होता तसा पाडला नसून त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता नक्कीच परिवर्तन करतील असा विश्वास देखील श्री. परब यांनी आज येथे व्यत केला. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
