राऊत पिता पुत्रासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल

कुडाळ व सावंतवाडी येथील भोंदू बाबांवर गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
वैवाहिक फसवणूक करत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलाच्या पत्नीने पोलिसात केली आहे. या प्रकरणी माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह ७ जणांवर कापूरबावडी (ठाणे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफ.आय.आर. मध्ये दिलेल्या माहितीनुसार दिनांक ३ डिसेंबर २०१७ रोजी फिर्यादीचा विवाह गीतेश विनायक राऊत यांच्याशी झाला. परंतु विवाहाच्या वेळी महत्वाची माहिती लपवून आपली वैवाहिक फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादीने केली आहे. तसेच विवाहानंतर पती व सासूने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.

याव्यतिरिक्त वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी भोंदू बाबांकडे नेऊन आपल्यासोबत अंगावर कोणतेतरी पाणी टाकणे, डोक्यावर लिंबू कापणे, हाताला सुगंधी द्रव्य लावणे, काळया कणकेच्या बाहुल्या, लिंबु, टाचणी, अंगारे धुपारे, कच्च्या मांसाचे तुकडे, जिवंत कोंबडा, माझे डोक्याचे केस उपटणे, मला गोमुत्र प्यायला देणे, विभुतीची पडलेली राख पाण्यामध्ये टाकुन प्यायला देणे इत्यादी अघोरी प्रकार केल्याचे देखील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गीतेश विनायक राऊत (वाकोला सांताक्रूझ), विनायक भाऊराव राऊत (वाकोला, सांताक्रूझ), शामल विनायक राऊत (वाकोला, सांताक्रूझ), चुलत सासरे आबा राऊत (भांडुप, मुंबई), फिरोज बाबा (कोलगाव, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), काजी बाबा (करूळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी), हरीशचंद्र घाडी (नानेली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप परमेश्वर धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page