कुडाळ मान्सून रन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये माजी आमदार वैभव नाईक सहभागी

ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्राॅप यांच्यासमेवत मॅरेथॉनचा लुटला आनंद

कुडाळ प्रतिनिधी
येथील राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून आज सकाळी पहाटे कुडाळ येथे आयोजित केलेल्या कुडाळ मान्सून रन २०२६ या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सहभागी होत पाच किलोमीटर अंतर निर्धारित वेळेत पूर्ण केले. यावेळी मेडल आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित असलेले केनिया देशातील “इंटरनॅशनल वर्ल्ड मॅरेथॉन विनर व ऑलिम्पिक चॅम्पियन” विल्सन किप्राॅप यांच्यासमेवत वैभव नाईक यांनी मॅरेथॉनचा आनंद घेतला.राणे हॉस्पिटलच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page