हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील सौ उमा उत्तम निर्गुण या महीलेने काजु व्यवसायात यशस्वी पदार्पण

पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते झाला शुभारंभ!

कुडाळ (प्रतिनिधी)
हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील कर्तबगार महीला सौ उमा उत्तम निर्गुण या महीलेने काजु युनिट व्यवसायात पदार्पण केल्याने महीलांसमोर आदर्श ठेवला असुन आज या व्यवसायाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला
हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील सौ निर्गुण ही महीला बचत गटांच्या माध्यमातून काम करत असताना स्वतः च्या काजु बागेत काजु उत्पादनाकडे परीश्रम घेत शेतीची आवड असलेली ही महीला स्वतः ची असलेली जागेवर आपले पती श्री उत्तम निर्गुण यांच्या पाठबळावर आंबा काजु लागवडीकडे मेहनत घेत आज आपल्याच मिळणा-या काजु या साठी काजु युनिट सुरू करुन नविन व्यवसायाला गुढीपाडवा शुभमुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. यावेळी काजु युनिट साठी लागणा-या सर्व मशनरी बसवुन घेऊन या नविन व्यवसायामुळे रोजगार तर मिळाला या शिवाय या सौ निर्गुण महीलेने महीलांसमोर आदर्श घालून दिला आहे
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष स्नेहल सामंत, पोलीस पाटील श्री सुबोध सावंत, जेष्ठ ग्रामस्थ दीपक चव्हाण,मसाला उद्योजक श्री प्रकाश परब माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या शुभहस्ते सर्व मशिनरी चे उद्घाटन करण्यात आले
यावेळी तुषार चव्हाण, सौ रुपा चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ शिल्पा मयेकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ गुंजकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर, सौ दर्शना परब, भाऊ गुंजकर, उत्तम निर्गुण, समिक्षा परब, सुरेश चव्हाण, आपा राणे, रोहन परब, शरयु चव्हाण, दाजी चव्हाण, अमित सावंत आदी ग्रामस्थ महीला उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page