मतदार संघातील विविध समस्यांबाबत वाचला पाढा
कुडाळ प्रतिनिधी
आज पंचायत समितीची मासिक सभा पार पडली.आर्थिक वर्षातील शेवटची सभा होती.नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य पहिल्याच वेळी सदस्य उपस्थित होते
माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी विविध समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करत आक्रमक होत सभा गाजवली.मासिक सभेत अनेक विषय मांडण्यात आले
माणगाव मधील आरोग्य विभागाचा आढावा घेत माणगाव मध्ये ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी केली त्यासंदर्भात प्रस्ताव संबंधित यंत्रणेकडे पाठवावा असं ठराव मांडण्यात आला तसेच माणगाव दत्त मंदिर ते माणगाव स्टॉप यादरम्यान पावसात पाणीच साचते त्या पाण्याची योग्य ती व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व्हावी अशी मागणी करण्यात आली.
माणगाव मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय असल्यामुळे कालेली तांदुळी मोरे या भागातील विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी गाडीची व्यवस्था व्हावी
माणगाव मधील केंद्रशाळा माणगाव नंबर २ या शाळेचे छप्पर नादुरुस्त झाले आहे यासंदर्भात तीन वर्षे येथील ग्रामस्थ पालक पाठपुरावा करून देखील या शाळेला छप्पर दुरुस्ती देण्यात आली नाही.शाळेची इमारत दुरुस्त करावे अशी मागणी करण्यात आली तसेच वसुली, उपवडे तेरगळवाडी, मोरे नं २ यादेखील शाळा दुरुस्त व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली.
साळगाव माणगाव रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.कंत्राटदार कडून रात्रीच काम सुरू यावर आक्षेप घेत सदर कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली
झाराप हायवेला मिडलकट किंवा बॉक्स वेल व्हावा अशी मागणी करण्यात आली. झाराप हायवेला मिळेल कट किंवा बॉक्स वेल नसल्यामुळे माणगाव वरून किंवा माणगावला जाणाऱ्या वाहनांना झिरो पॉईंट कडून जावे लागते आणि एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तब्बल सहा रुपये वाढतात.येण्या जाण्यासाठी एकूण बारा रुपयांचा भुर्दंड बसतो यासंदर्भात योग्य ती कारवाई किंवा व्यवस्था होऊन माणगाव खोऱ्यातील प्रवाशांना दिलासा मिळावा अशी मागणी करण्यात आले
जलजीवन च्या माध्यमातून माणगाव ते निळेली ही नवीन पाईपलाईन लवकरात लवकर जोडून पाण्याची व्यवस्था व्हावी व माणगाव मधील पाण्याची व्यवस्था सुरळीत व्हावी.अशा विविध समस्यांबाबत वाचला प्रश्नाचा पाढा.पहील्याच सभेत आक्रमक होत योगेश धुरी यांनी गाजवली मासीक सभा
