मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ संदर्भातील,सोशल मीडियावरील संदेश पुर्णपणे खोटा

अशी कोणतीही योजना नाही,फसव्या अफवांवर विश्वासू ठेवू नये सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने सोशल मीडियावर प्रसारित होत असलेला संदेश पूर्णपणे खोटा असून, महिला व बाल विकास विभागाकडून अशी कोणतीही योजना राबविण्यात येत नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा फसव्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे…

Read More

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

नगरसेवक उदय मांजरेकर यांची मागणी कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी मोकाट जनावरे गाय, बैल रस्त्यांवर मुक्तपणे फिरत असून नगरपंचायत हद्दीमध्ये चालू आठवड्यामध्ये मोकाट जनावरांमुळे दोन ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडून आले आहेत. सदर मोकाट फिरणा-या जनावरांमुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेस तसेच स्वच्छतेस धोका निर्माण…

Read More

शासनाची बंदी असताना,सिंधुदुर्गातील कोरजाई खाडीत अवैध वाळू उत्खनन जोमात सुरूच

महसूल मंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली,मंत्र्यांच्या आदेशाला वाळू माफीयांनी अक्षरश: केराची टोपली दाखवली जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची निष्क्रियता.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरजाई खाडीत गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन अजूनही थांबलेले नाही. विशेष म्हणजे, महसूल मंत्र्यांनी विधानसभेत कारवाईचे आदेश देऊनही आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही ही चोरटी वाहतूक जोमात सुरूच आहे. शासनाची बंदी असताना,…

Read More

दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्यांकडे आमदार दिपक केसरकर यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे वेधले लक्ष

आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने उपाययोजनांची केली मागणी मुंबई प्रतिनिधी दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यातील वीज समस्यांकडे राज्याच्या ऊर्जा आणि महिला बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे लक्ष वेधत आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली. मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या विविध समस्या चर्चेत आणण्यात आल्या. या बैठकीस गृहराज्यमंत्री योगेश कदम, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश…

Read More

कुडाळ- वाडिवरवडे येथील २१ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे-माधववाडी येथे २१ वर्षीय मंदार मनोज राजापूरकर या तरुणाने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदार गवंडी कामासाठी जात असे. रविवारी रात्री तो झोपण्यासाठी…

Read More

नितेश राणेंनी वाढवण बंदरातील नोकऱ्यांचे आमिष देण्यापेक्षा नारायण राणेंनी घोषणा केलेल्या रेडी बंदरातील नोकऱ्यांचे काय झाले? हे सांगावे

माजी आमदार वैभव नाईक यांचा राणेंना सवाल कणकवली प्रतिनिधी मंत्री नितेश राणे यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार अशी घोषणा केली आहे. मात्र ५०० किलोमीटर दूर असलेल्या वाढवण बंदरात सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगाराचे आमिष देण्यापेक्षा नारायण राणे यांनी बंदर विकास मंत्री असताना रेडी बंदर विकसित करून रेडी बंदराच्या माध्यमातून जिल्ह्यातील…

Read More

काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे निधन

सावंतवाडी प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत (६२) यांचे मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत, नातू, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. विकास सावंत माजगाव येथील आपल्या निवासस्थानी होते. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच…

Read More

रविवारी 20 जुलै रोजी चा कुडाळ तालुका भंडारी समाज मेळावा व गुण गौरव सोहळा यशस्वी करणार:माजी सभापती श्री संजय वेंगुर्लेकर

मेळाव्यास पालकमंत्री ना नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती..! कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुका भंडारी समाजाचा मेळावा आणि दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा न भुतो न भविष्य तो असा कार्यक्रम होणार असुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भंडारी समाजातील प्रत्येकांनी मेहनत घेऊन आपली एकजुटी दिखवुया असे आवाहन कुडाळ तालुका भंडारी समाज बैठकीत कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती…

Read More

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर होणे ही काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, जिल्हा परीषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग संयुक्त वृक्ष लागवड मोहिम राबवित आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने आज खासदार नारायण राणे यांच्या हस्ते गरुड चौक ते जेल रोड रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी…

Read More

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द

21 जुलैपर्यंत हरकती पाठविण्याचे आवाहन* सिंधुदुर्गनगरी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत राज्य…

Read More

You cannot copy content of this page