ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाच्या “सोशल मिडीया लॅबच्या” इमारतीचे भूमीपूजन संपन्न

सिंधुदुर्ग प्रतिनिधी इंटरनेट हे सध्या कोणत्याही प्रकारची माहिती सहज प्राप्त करण्याचे व दळणवळणाचे प्रमुख साधन बनले असून दिवसेंदिवस त्याचा अगणित वापर होताना दिसत आहे. इंटरनेटच्या व सोशल मिडियाच्या चांगल्या उपयोगाबरोबरच समाजविघातक प्रवृत्ती, गुन्हेगार यांचेकडून सामाजिक अशांतता, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे संदेश, व्हीडिओ व ऑडिओ क्लिप प्रसारीत करणे, वैयक्तिक स्वार्थासाठी इतर व्यक्तींची बदनामी करणे,…

Read More

संत शिरोमणी श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राच्या हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन…

सावंतवाडी प्रतिनिधी कोकणातील संतांचे संत शिरोमणी दाणोली नगरीचे श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राच्या हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सकाळी दाणोली येथील साटम महाराज समाधी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. लेखक र. ग. वायंगणकर यांनी साटम महाराज यांचे चरित्र पुस्तक रूपात लिहिले आहे. समस्त साटम महाराज भक्त परिवारामध्ये ते लोकप्रिय ठरले आहे….

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळणार

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे मंत्री नितेश राणे यांना आश्वासन मुंबई प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टी आय टी ) तसेच संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणासोबत बैठक घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेवू असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री…

Read More

व्हॉइस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर…

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जगातील तब्बल ५१ देशांमध्ये पत्रकार बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारी कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे संपन्न झालेल्या सभेत प्रा.पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ जिल्हा सिंधुदुर्ग कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – १) प्रा. रुपेश…

Read More

स्वतंत्र नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये “स्वतंत्र अधिकार नागरिक कक्ष” सरकार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी वैध नागरिकांसाठी कल्याणकारी उपाय व सुविधा पुरविणे, राज्यघटना दत्त वृध्दांचे हक्क अबाधित. वृद्धांची आर्थिक सुरक्षितता, आरोग्य, पोषण मुल्य, निवारा, शिक्षण, कल्याणकारी जीवन जगता यावे. यास्तव त्यांचे व मालमत्तेचे संरक्षण करणे, ज्येष्ठ नागरिकांचे विविध स्तरावर होणारे संरक्षण, पिळवणूक यापासून त्यांचे संरक्षण करणे, समाजातील त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, त्यांना आपत्कालीन मूलभूत…

Read More

कुडाळ तहसीलदार यांचा दालनाबाहेर तक्रार पेटी उपक्रम आदर्शवत

मनसे मार्फत कुडाळ तहसीलदार यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार कुडाळ यांनी सुचना / तक्रार पेटी बसवली असून लोकांनी सुचना किंवा तक्रारी या मधे लिहून टाकाव्यात याची दखल खुद्द तहसीलदार घेणार अशा उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच तहसीलदार यांनी केले. तालुक्याच्या ग्रामीण भागातून विविध कामांकरिता येणाऱ्या सामान्य नागरिकांना अनेक अडचणी येतात, उदा….

Read More

अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाईसाठी कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर रमेश सावंत यांचे उपोषण…

माणगाव ग्रामपंचायतच्या दोष पात्र व भ्रष्ट कारभार करणाऱ्या कारवाई करा कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील माणगाव येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट व दोष पात्र कारभार करणाऱ्या अधिकारी व लोकसेवक यांच्यावर कार्यवाही करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश सखाराम सावंत (मुक्काम पोस्ट – माणगाव – बंदिचे माड, तालुका – कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग) यांनी बेमुदत उपोषण छेडले आहे. कुडाळ येथील गटविकास…

Read More

येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका; कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीने राहणार- वैभव नाईक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद विभागीय पक्ष निरीक्षक पदी कृष्णा धुरी व सचिन कदम व कुडाळ शहर निरीक्षक पदी सुशील चिंदरकर यांची नियुक्ती कुडाळ प्रतिनिधी आजपर्यंत जे जे कोणी शिवसेना सोडून गेले आहेत त्यांची ताकद निष्ठावंत शिवसैनिकांनी मोडून काढली आहे. जो पर्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला धक्का लागणार…

Read More

बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर..

शिवसेना कामगार सेनेच्या प्रसाद गावडेंची माहिती. सिंधुदुर्ग प्रतिनिधी शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 3965 बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर करण्यात आले असून मंडळाने DBT प्रणालीने रु.3 कोटी 62 लाख एवढी रक्कम बांधकाम कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे. माहे फेब्रुवारी 2024 पासूनचे कामगारांचे प्रस्ताव ऑनलाईन पडताळणी…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची सोमवारी बैठक

वैभव नाईक,परशुराम उपरकर,राजन तेली,संदेश पारकर,सतिश सावंत करणार मार्गदर्शन.. पदाधिकारी, शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक सोमवार दि.०३ /०३ /२०२५ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्र.२ येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईक,माजी आमदार परशुराम ( जीजी) उपरकर,…

Read More

You cannot copy content of this page