तेव्हा स्वार्थासाठी होता तो निर्णय मी घेतला नाही तर आता कशाला घेईन; वैभव नाईक
शिवसेनेच्या मालवण तालुका बैठकीला देखील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. मालवण प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी अपार कष्ट केले.सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली.म्हणून आपल्याला ७३००० मतांपर्यंत मजल मारता आली. मी सामान्य माणसांचा लोकप्रतिनिधी होतो. आणि सर्व सामान्य नागरिक,कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिले. त्यामुळे पुढील काळात आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढ काम मी करणार आहे.शेवटचा माणूस जोपर्यंत…
