गांजा सेवन केल्याप्रकरणी शिक्षकांवर कारवाई

कुडाळ प्रतिनिधी
मुंबई गोवा हायवेवर महामार्गावर झाराप पेट्रोलपम्प येथे गांजा सेवन केल्या प्रकरणी श्री. विनायक रामचंद्र पाटील वय वर्षे 34 याच्यावर आज रविवारी, दिनांक, 13.04.2025. रोजी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर रित्या गांज्या या अमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांच्या निदर्शनास आले या प्रकारणी कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

श्री. विनायक रामचंद्र पाटील वय वर्षे 34 हे सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील एका नामवंत शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. काही कारणास्तव या शिक्षकाला त्या संस्थेतून कमी करण्यात आले होते. आणि त्याला कुडाळ पोलिसांनी गांजा सेवन केल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई 13 एप्रिल च्या रात्री दोन वाण्याच्या सुमारास घडली. संशयित आरोपी म्हणून, श्री. विनायक रामचंद्र पाटील याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारवर परिणाम करणारे पदार्थ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची तक्रार कुडाळ पोलीस कर्मचारी सुबोध साबाजी मळगावकर यांनी दिली आहे. ही कारवाई कुडाळ पोलिस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस, श्री. जाधव, श्री कराडकर, पोलीस हवालदार पाडगावकर अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page