माणगाव-नांनेली भागातील गुणवंत शिष्यवृत्तीधारकांचा घरी जाऊन विशेष सत्कार..!

माणगाव (प्रतिनिधी):
“आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याच्या उज्ज्वल समाजाची ताकद!” या भावनेतून माणगाव–नांनेली भागातील शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. शिवसेना-युवासेना आणि पंचायत समिती सदस्य श्री. योगेश धुरी यांच्या संयुक्त विद्यमाने थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हा सत्कार सोहळा पार पडला.
यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन सूर्यकांत धुरी याने संपूर्ण जिल्ह्यात ८ वा क्रमांक पटकावून दैदिप्यमान यश मिळवले. तसेच वैष्णवी न्हानू गावडे, मिताली मिलिंद धुरी, स्वरा शिवराम काणेकर, शुभ्रा महेश भिसे आणि प्रथम रवीसंदेश बांदेलकर यांनीही चमकदार कामगिरी करत यश संपादन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे कौतुक केले, तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी अचानक घरी येऊन पाठीवर दिलेली कौतुकाची थाप पाहून विद्यार्थी व पालकांनी अत्यंत आनंद व कृतज्ञता व्यक्त केली.
या कौतुक सोहळ्याप्रसंगी माणगावचे उपसरपंच बापू बागवे, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, अवधूत गायचोर, काजल नाईक, ईश्वरी सावंत, शिवसेना उपविभाग प्रमुख शैलेश विर्नोडकर आणि युवासेना विभाग संघटक सचिन तेली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page