महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची १५ नोव्हेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रकानुसार १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा
सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन पत्रानुसार, कोकण व नाशिक विभागातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित लेखी परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शासनाकडून जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार लेखी परीक्षा दिनांक १७ जानेवारी २०२७ रोजी होणार…
गुणवंतांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा, प्रशासकीय सेवेत समाजाचा ठसा उमटवा! प्रा. रुपेश पाटील यांचे तरुणाईला आवाहन
बांदा प्रतिनिधी “मराठा हे केवळ एक नाव नसून ते एक व्रत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा जपत समाजाने प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केली पाहिजेत. समाजातील गुणवंतांच्या यशाचा आदर्श नव्या पिढीने डोळ्यांसमोर ठेवावा. तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे वळून प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवावा. समाजातून गुणवत्तापूर्ण अधिकारी निर्माण होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे,” असे प्रेरणादायी…
कुडाळ रेल्वे स्थानकावर मधु दंडवते यांना आदरांजली
कुडाळ प्रतिनिधी राजकारणातील तत्त्वनिष्ठ तपस्वी म्हणजे प्रा. मधु दंडवते. कोकण विकास, कोकण रेल्वे आणि प्रा. दंडवते यांचे अजोड नाते आहे, जेव्हा जेव्हा कोकण विकासाचा विषय येईल, कोकण रेल्वेच्या योगदानाचा विषय येईल तेव्हा कोकण विकास आणि प्रा. मधु दंडवते यांचे नाव दुर्लक्षित करून चालणार नाही. कोकणचा विकास ज्या वेगाने होत आहे. मुंबई आणि कोकणची माणसं त्यांचे…
सावंतवाडीच्या पहाटे सुरांची बरसात! ‘सुरमयी दिवाळी पहाट’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी ही सिंधुदुर्गची सांस्कृतिक राजधानी! आमदार दीपक केसरकर यांचे प्रतिपादन सावंतवाडी प्रतिनिधी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भक्तिसंगीताचे स्वर, नाट्यसंगीताची भावस्पर्शी लय आणि लोकप्रिय मराठी गीतांची सुरेल बरसात… अशा संगीतमय वातावरणाने सावंतवाडीकरांची दिवाळी पहाट अधिकच मंगलमय झाली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या संगीत सोहळ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला….
सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या प्रतिकृतींतून कलाविष्काराचा जागर!, नरकासुरांच्या महाकाय प्रतिकृतींचा रंगणार अद्भुत थरार!
भाजपाचे ज्येष्ठ विनोद राऊळ व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे कल्पक नियोजन तर युवा नेते विशाल परब यांचे दमदार प्रायोजन! स्पर्धा फक्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादित असणार,खुला गट, बालगटासह रील स्पर्धेचीही धूम रंगणार! सावंतवाडी : दीपोत्सवाच्या मंगलमय पर्वात कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष अधिकच उंचावण्यासाठी सावंतवाडीत उद्या नरकासुरांच्या कलात्मक प्रतिकृतींचा थरार अनुभवायला मिळणार आहे. भारतीय जनता…
संदेश भाई” काळाच्या पडद्याआड! माणगाव खोऱ्याचा अजातशत्रू हरपला; कॅन्सरशी साडेचार वर्षांची झुंज संपली
संघर्षातून उभा राहिलेला माणूस अखेर थांबला; माणगावचे लाडके “संदेश भाई” कालवश हसरा चेहरा, मोठं मन… माणगावचा अजातशत्रू हरपला! सिंधुदुर्ग प्रतिनिधी माणगाव तिठा येथील हॉटेल प्रथमचे मालक आणि माणगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य शिवराम उर्फ संदेश केसरकर (वय ५४) यांचे आज, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. “संदेश भाई” या नावाने संपूर्ण माणगाव खोऱ्यात…
पाचव्या दिवशी पिंगुळी ग्रामस्थांचे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे…
बांधकाम स्थगित ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्या मधील पिंगुळी येथील पाझर तलाव वाचविण्या साठी कुडाळ प्रांत कार्यालया समोर जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर आणि पिंगुळी ग्रामस्थांचे सोमवारपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर आज पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या मान्य करीत लेखी आश्वासनाचे पत्र दिले….
गोठोसमध्ये चार दिवस दीपोत्सवाची धूम! १४ व्या वर्षी दीपावली महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…
मा.श्री. प्रकाशजी मोर्ये मित्र मंडळ गोठोस आयोजित… गोठोस प्रतिनिधी मा. श्री. प्रकाशजी मोर्ये मित्र मंडळ, गोठोस यांच्या वतीने यंदा १४ व्या वर्षी भव्य दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ८ नोव्हेंबर ते बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि पारंपरिक कार्यक्रमांची मेजवानी गोठोसवासीयांसह परिसरातील नागरिकांना अनुभवता येणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ…
स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल
पालकमंत्री नितेश राणे ; भाजप आयोजित दिवाळी बाजाराचे उद्घाटन कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा सध्या दुष्काळाच्या संकटात असून ट्रिगर वनमध्ये आहे. अशा परिस्थितीत स्थानिक बाजारपेठेला ताकद देणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढले आहे. दिवाळी बाजारात होणारा प्रत्येक व्यवहार हा जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा असून त्याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावर होणार आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेते, व्यावसायिक आणि…
बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा वनविभागाने केला पर्दाफाश:कुडाळ एसटी डेपो येथे तिघांना अटक
१२ वाघनखांच्या विक्रीसाठी अडीच लाखांचा व्यवहार;दोघांना दोन दिवसांची वनकोठडी कुडाळ : वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. वाघनखे विक्री करण्यासाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरविण्यात आला होता. या व्यवहारादरम्यान वनविभागाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाघाचा एक दातसुळा, बिबट्याची दोन नखे आणि सोन्यामध्ये मढवलेले दोन सुळे जप्त करण्यात आले आहेत….
