किल्ले निवतीवर शिवजन्मोत्सव साजरा.. दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत आयोजन सिंधुदुर्ग प्रतिनिधी दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे वेंगुर्ले तालुक्यातील किल्ले निवतीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव निमित्ताने किल्ले निवतीवर बालेकिल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या वेळी ह.भ.प. संदेश गोसावी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. वेदांत वेंगुर्लेकर यांने…
कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गातील खेळाडूंचे यश
यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई, थाई बॉक्सिंग असोसिएशन, सिंधुदुर्ग तर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत कुडाळ, ओरोस, कट्टा मधील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. राजमाता जिजाऊ सभागृह ओरोस येथे ही परीक्षा पार पडली. सदर परीक्षेमध्ये वेदा परब ,देव पालकर यांना येलो बेल्ट तर मंथन मठकर, माही मठकर, ओम बांबर्डेकर,…
भोसले नॉलेज सिटी येथे ‘शिवजयंती ‘ उत्साहात
पोवाडे,नामघोष व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण चैतन्यमय….. सावंतवाडी प्रतिनिधी भोसले नॉलेज सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत संस्थेच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले. त्यानंतर कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षा ऍडव्होकेट अस्मिता सावंतभोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक,…
मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी
मा.आम.वैभव नाईक यांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन. मालवण प्रतिनिधी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भगवे झेंडे, भगवे फेटे, भगव्या शाली परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज कि जय!…
सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर
सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली होती त्यानुसार सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्यात कुडाळ तालुक्यातील तीन तर…
शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅली व सभेला सकल मराठा समाजाने व हिदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-सीताराम गावडे
शिवप्रेमी संघटना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद,गोरक्षक संघटनेचे आयोजन सावंतवाडी प्रतिनिधी शिवप्रेमी संघटनां सावंतवाडी, बजरंग दल, विश्र्व हिंदू परिषद,गोरक्षक संघटना,यांनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅली व सभेला सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती कार्यक्रम यशस्वी करून हिदू समाजाची एकजूट दाखवावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे. दरवर्षी…
सिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार ‘पालकमंत्री कक्ष’
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल कणकवली प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांची भेट घेता यावी, त्यांचे जिल्हा प्रशासनासंदर्भातील प्रश्न, समस्या त्याच ठिकाणी मार्गी लावाव्यात या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच लवकरच ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी पालकमंत्री स्वतः जनतेचे प्रश्न, समस्या मार्गी…
अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी च्या वतीने शिवजयंती महोत्सव 2025 आयोजन
सर्व शिवप्रेमी व प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा:तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत सावंतवाडी प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघ, सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी शहरात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानातील मुख्य दरवाजा परिसरात शिवजयंती महोत्सव २०२५ चे आयोजन केले आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रम संपन्न होणार असून सायंकाळी सहा वाजता शिवजयंती महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर…
शिवजयंती निमित्त सावंतवाडी उभा बाजार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यक्रम
सावंतवाडी प्रतिनिधी उभाबाजार बाल गोपाळ मित्र मंडळाच्या वतीने सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे शिवजयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पाककला स्पर्धा तसेच लहान मुलांचे खेळ दशावतार नाटक आदिचा यात समावेश करण्यात आला आहे. सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात त्याच प्रमाणे यावर्षी ही शिवजयंती निमित्त…
