सावंतवाडीच्या मोती तलावात युवकाचा मृतदेह सापडला, युवतीच्या शोधासाठी मोहीम सुरू
सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध मोती तलावात शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली. तलावात उडी घेतलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीनेही तलावात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, युवतीचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळी…
