पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमीत्त वेंगुर्लेत महाआरती

वेंगुर्ला प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्त वेंगुर्लेत भाजप च्या वतीने चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते .
सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना शाल व पुष्पहार घालुन वारकरी संप्रदायाचा सन्मान करण्यात आला , त्यानंतर महाआरती करण्यात आली .तसेच कमला एकादशीनिमित्त अरुण सावंत बुवांचे किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेविका अँड.सुषमा खानोलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर कार्य करुन एक नवा विक्रम स्थापित केल्याचे सांगितले .
पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे केंद्र सरकार हे सनातनी धर्माचे पुरस्कर्ते असल्याने ५०० वर्षापासून प्रलंबित असलेले राममंदिरांची उभारणी झाली .जगाच्या नकाशावर भारताचे विकसनशील स्थान अधोरेखित केले . ह्या एक तपामध्ये मोदीजींनी राष्ट्र प्रगतीपथावर नेले . तसेच हिंदुस्थान परम् वैभवशाली बनविण्यासाठी मोदीजी दिवस रात्र मेहनत घेत असल्याचे सांगितले .
यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब , उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर , मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर , युवा मोर्चाचे नगरसेवक प्रणव वायंगणकर , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर , नगरसेवक सचिन शेटये , नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेवक रविंद्र शिरसाठ , नगरसेवक सदानंद गिरप , नगरसेवक विनु मोर्डेकर , माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर , नगरसेवीका आकाक्षा परब , नगरसेवीका रिया केरकर , नगरसेवीका काजल कुबल, नगरसेवीका गौरी माईणकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , विनय गोगटे , नाना महाजन, किरण मेस्त्री , तसेच वारकरी संप्रदायाचे किशोर रेवंणकर , गजानन कुबल , दिलीप कुर्ले, सुभाष कुर्ले , रामकृष्ण डिचोलकर , सहदेव गिरप, अंकुश वराडकर , गोपीनाथ म्हाकले , महानंदा मयेकर , गौतमी कुबल , लता खोबरेकर , दुर्गा कुबल , जोस्ना कुबल , महेंद्र पालव , संजय गिरप व कुबल सर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page