कुडाळ गुन्ह्यातील फरार आरोपीला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

गुन्हा करून फरार असलेला आरोपी मोशी, पुण्यातून जेरबंद

कुडाळ प्रतिनिधी
अपहरण व धोकादायक शस्त्राने दुखापत करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेने ही कारवाई केली असून त्याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. विलास संभाजी वसेकर (वय. ३५, राहणार टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर भा. न्या. संहिता 2023 चे कलम 140(3), 115(2), 118(1), 189(2), 190,191(2), 351(2), 352, 49,54 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर आरोपी गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून फिरत होता. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या शाखेला हा आरोपी मोशी, पुणे येथील कचरा डेपो येथे अँथनी लारा रिनेवबल एनर्जी या कंपनीत कामास असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नमूद आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करून त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याचा शोध घेत त्याला दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं. ४ वाजता पुणे, मोशी येथून ताब्यात घेतले.

आरोपीकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाहीकरिता त्याला आज दिनांक ↑ क्टोबर २०२६ रोजी रोजी कुडाळ पोलीस ठाण्याच्या ताष्पात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा. कु. नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, सदानंद राणे, पोलीस अंमलदार अमर कांडर व प्रथमेश कदम (मोपवि) यांच्या पथकाने केली आहे.

आरोपीचा पूर्व इतिहास

नमूद आरोपीविरुद्ध बार्शी पोलिस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे IPC 304 B, 354 A अशा प्रकारचे एकूण 03 गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page