जिल्ह्यातील महामार्गांवरील प्रवाशांना घातक ठरतील अशा होर्डिंग्ज तात्काळ हटवा
सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जिल्ह्यातील सर्वच महामार्गांवर ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेले दिसत असून ते भविष्यात पावसाळ्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच रहदारीच्या नागरिकांना घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालच मुंबई घाटकोपर येथे एका पेट्रोल पंपाशेजारीच उभारलेले लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण दुर्घटना घडून त्यात 14 नागरिकांचा मृत्यू तर 35…
