सिंधुरत्न योजनेचा निधी ज्या ज्या कामासाठी खर्च झाला त्याची चौकशी व्हावी

ठाकरे शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी…

सावंतवाडी प्रतिनिधी
मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुरत्न योजने अंतर्गत देण्यात आलेल्या निधीची व ज्या कामांसाठी खर्च झालेला आहे. त्या सर्व कामांची तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन करण्यात आली आहे.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख यशवंत परब, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी निवेदन दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, सिंधुरत्न योजनेच्या निधी ज्या-ज्या कामांसाठी खर्च झालेला आहे. त्या सर्व निधीच्या वापराची चौकशी करण्यात यावी. विशेषकरुन सिंधुरत्न योजनेच्या निधीतून करण्यात आलेली विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या कामांची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच सिंधुरत्न योजनेच्या निधीचा वापर करताना मंजूर करण्यात आलेल्या कामांचे निकष तपासून पाहणे आवश्यक आहे. कारण काही निधी सर्वसामान्यांसाठी खर्च न होता, वैयक्तिक व व्यावसायिक लोकांसाठीच विद्युत ट्रान्सफॉर्मर मंजूर करुन व्यावसायिकांसोबतचे वैयक्तिक संबंध जपण्यासाठी सिंधुरत्न योजनेचा गैरवापर करण्यात

आला असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत चौकशी करा,

मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page