*श्री दत्तमंदिर सावंतवाडी येथे २६ जून रोजी होणार श्री टेंबे स्वामी पुण्यतिथी उत्सव*

श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा, सावंतवाडी येथे आषाढ शुध्द प्रतिपदा गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी सालाबादप्रमाणे श्री टेंबे स्वामी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे.
यावेळी खालील प्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ७.०० वा. एकमुखी दत्त पूजा, एकादशमी व लघु रुद्र, ९.०० वा. श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी १२.३० वा. श्रींची आरती, १.०० वा. महाप्रसाद, सायं. ७.०० वा. आरती, ७.३० वा. श्री टेंबे स्वामी पालखी सोहळा, रात्री ८.३० वा. भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तगणांनी या कार्यक्रमास उपस्थितीत राहून स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page