बांदा येथे काल गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी कारवाई,कारसह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त
बांदा प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुहागर येथील एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख २५ हजारच्या दारू सह इनोव्हा कार असा मिळून १३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल बांदा येथे करण्यात आली. प्रथमेश दीपक भाटकर (वय २९, रा. गुहागर) असे संशयिताचे नाव आहे….
