प्रतिबंधित गुटखा वाहतूकदाराला पुरविल्या प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद..

कणकवली :
शासनाने प्रतिबंधीत केलेला ३ लाख ८१ हजार २१६ रुपयांचे गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ बेळगांव ते वेंगुर्ले अशी वाहतूक करून विक्रेत्यांना पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेला ट्रान्सपोर्ट व्यावसायीक मोहन निलेश परब (रा. वेंगुर्ले कॅम्प भटवाडी) याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी ५०० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी निवती पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी केळुस तिठा येथे वाहन तपासणी करत असताना रात्री ११.३० वा. वेंगुर्ले ते मालवण जाणारी मारूती कार तपासली असता त्यात चार गोण्या पान मसाला व गुटखा आढळून आला. त्यामुळे वाहनचालक रामचंद्र लुडबे व प्रफुल्ल लुडबे यांना ताब्यात घेतले होते. तपासात जप्त मुद्देमाल हा मोहन परब याने त्यांना आणून दिल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आरोपींवर भा.न्या.सं. कलम १२३, २२३. २७१, २७५ व अन्न सुरक्षा अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आरोपीला ९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीने जामिनासाठी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना तपास कामात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा न करणे, पोलीस स्टेशनला हजेरी लावणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page