राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला, शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव
दोषींवर गुन्हे दाखल करा – वैभव नाईक मालवण, प्रतिनिधी नौदल दिनानिमित्त राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळला. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत….
