नागेश सुर्यवंशी ठरला ‘सिंधुदुर्ग केसरी ;महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी झाली निवड

सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जि. अहिल्यादेवीनगर येथे होणार्‍या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेच्या संघाची जिल्हा निवड चाचणी देवज्ञ गणपती मंदिर, सावंतवाडी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत ‘मल्लसम्राट’ प्रतिष्ठानचा पठ्ठ्या नागेश सुर्यवंशी ‘सिंधुदुर्ग केसरी’ ठरला असून त्याची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या राज्य स्पर्धेसाठी पात्र कुस्तीगीरांचा संघ…

Read More

कणकवलीत भर दिवसा एकाचे पैसे हातोहात केले लंपास,घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ

फसवणूक झाल्याची बाब उघडकीस येतात त्या व्यक्तीने तात्काळ पोलिसात धाव घेतली कणकवली प्रतिनिधी कणकवली स्टेट बँकेत हातचलाखी करत कसवण तळवडे येथील एका व्यक्तीचे 20 हजार रुपये हातोहात लंपास केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान ज्या व्यक्तीचे पैसे लंपास केले त्याच्या हातात नोटांच्या आकाराचे दुमडलेले कागद पिशवीमध्ये पॅक करून देत त्याला फसवण्यात…

Read More

रविंद्र खेबुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्विकारला पदभार

सिंधुदुर्ग दि १७ (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रविंद्र खेबुडकर यांनी आज पदभार स्वीकारला. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासन अनेक महत्वाकांक्षी योजना राबवित असते. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जिल्ह्याची विकासाकडे घोडदौड सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पायाभूत सोयी सुविधांचे…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली आणि ओरोस येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण कणकवली प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली आणि ओरोस येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ओरोस जिल्हा मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवपुतळ्याला व शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जय भवानी जय…

Read More

डंपरची धडक बसल्यामुळे शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच ठार…

पाट तिठा परीसरातील सकाळची घटना, कुडाळ प्रतिनिधी वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरची धडक बसल्यामुळे गाडीखाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी जागीच ठार झाली. ही घटना आज सकाळी पाट तिठा परिसरात घडली. मनस्वी सुरेश मेथर (वय १५) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अभ्यास करण्यासाठी आपल्या मैत्रिणीकडे जात असताना ही घटना घडली. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी निवती…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलची ‘सुवर्ण ‘कामगिरी….

सायन्स ऑलिंपियाड मध्ये १७ गोल्ड…. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले. शाळेच्या एकूण ७५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १७ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे: इयत्ता दुसरी – मानस विजय परब, तिसरी…

Read More

बांदा येथे काल गोवा‌ बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी कारवाई,कारसह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त

बांदा प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुहागर येथील एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख २५ हजारच्या दारू सह इनोव्हा कार असा मिळून १३ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल बांदा येथे करण्यात आली. प्रथमेश दीपक भाटकर (वय २९, रा. गुहागर) असे संशयिताचे नाव आहे….

Read More

झोळंबे येथील पूजा गवस यांची “ऍट्रॉसिटी” च्या आरोपातून निर्दोष मुक्तता

दोडामार्ग प्रतिनिधी झोळंबे येथील सौ. पूजा दीपक गवस यांची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अर्थात ‘ऍट्रॉसिटी ‘ च्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. सिंधुदुर्ग चे विशेष न्यायाधीश श्रीमती सानिका एस. जोशी यांनी ही मुक्तता केली आहे. झोळंबे येथील गावठाणवाडी मधील पूजा दीपक गवस यांनी आपल्याला जातीवाचक शिवी गाळ केल्याची तक्रार फोंडू…

Read More

राजकीय अडचणीच्या काळात मित्र म्हणून सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी वडिलांना केलेल्या मदतीची मंत्री नितेश राणे यांनी जाण ठेवावी

आपल बेगडी हिंदुत्व दाखवण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बंद करावे-मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून सन्माननीय राज साहेबांच्या शिवतीर्थावर जाऊन मदत मागताना वेळ काळ बघितला नाही.बरं अडचणीच्या काळात राज साहेबांनी कसलाही विचार न करता निस्वार्थीपणे राणेंसाठी सभा घेतली. मा.प्रबोधनकार ठाकरे,मा.श्रीकांत ठाकरे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा…

Read More

हार्दिक शुभेच्छा.! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..!💐

💐🎂💐💐🎂💐💐🎂💐💐🎂💐 आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष *मिलिंद धुरी* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🌹🎂🌷 *🙏-:शुभेच्छुक:-🙏* *💐सौ.मानसी परब* (महिला जिल्हाध्यक्षा) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य…. 🌷🎂🌹🌷🎂🌹🌷🎂🌹

Read More

You cannot copy content of this page