जेष्ठ पत्रकार व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांच्या गळचेपीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून जाहीर निषेध

पोलिसांनी आपले काम प्रामाणिकपणे पार पाडले असते तर अशी वेळ येणार नव्हती सिंधुदुर्ग प्रतिनिधी गेली पस्तीस वर्षे पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणारे जेष्ठ पत्रकार तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक सिताराम गावडे यांच्याबाबत मालवण बीचवर अंमली पदार्थांचा सुळसुळाट नागरिकांत कुजबुज अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केल्यावर काही व्यावसायिक एकत्र येत सत्य दाबण्याचा प्रयत्न करतात हे निषेधार्ह…

Read More

पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

१० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा;वैभववाडी तालुक्यातील घटना वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी पोलीस ठाण्यात आलेल्या डायल ११२ च्या कॉलवर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित राजरत्न अंकुश देवकर (वय ३२, रा. कोकिसरे-नारकरवाडी) याला सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास व १८ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठीच्या बसचे लोकार्पण

सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयानुसार व मान्यतेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाकरिता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी तसेच आंतरवासियता प्रशिक्षणार्थी (इंटर्न डाॅक्टर्स) यांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठी ४४ आसनी बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. या बसचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज झाले.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती…

Read More

कामळेवीर येथे सकाळच्या वेळी घरफोडी रोख रक्कम फोटो स्टुडिओ चा कॅमेरा लंपास..

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील कामळेवीर येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास, गिरीश आळवे यांच्या बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख रक्कम, एक कॅमेरा आणि अन्य काही वस्तू लंपास केल्या आहेत. माणगाव येथील आपल्या फोटो स्टुडिओवर जाण्यासाठी गिरीश आळवे नेहमीप्रमाणे सकाळी घर बंद करून बाहेर…

Read More

वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम:पालकमंत्री नितेश राणे

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार; कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन कुडाळ प्रतिनिधी “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झाला महत्वकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा हेतू आहे. या उपक्रमातून भारताला आर्थिक सुभत्तता आणि महासत्ता…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात…..

देवगडचे श्रीपाद कुळकर्णी ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ – प्रामाणिक योगदानाचा गौरव…. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन आज मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मा लोगो, फार्मा स्लोगन, फार्मा रांगोळी अशा विविध स्पर्धांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार यावर्षी देवगड येथील ज्येष्ठ फार्मासिस्ट श्रीपाद कुळकर्णी यांना…

Read More

माणगाव खोऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

माणगाव (प्रतिनिधी) माणगाव खोऱ्यातील गेल्या दहा वर्षाचा बॅकलोग लवकरात लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा असा प्रत्येक मतदाराला अभिमान वाटला पाहिजे असा प्रत्येक विकास कामातून प्रत्यय देणार असून माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार असल्याची घोषणा आमदार निलेश राणे यांनी केली. माणगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे आज गुरुवारी माणगाव खोऱ्यातील उपवडे, वसोली, दुकानवाड, मोरे, वाडोस,…

Read More

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय संकल्पनेच्या आदर्शावरच भाजपाचे काम पुढे नेणार

भाजपा युवा नेते विशाल परब यांचे सावंतवाडी भाजपा कार्यालयात प्रतिपादन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत केले पूजन सावंतवाडी प्रतिनिधी भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने आज सावंतवाडी शहर भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये उद्या ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’:सहा.आयुक्त शशिकांत यादव राहणार उपस्थित

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला जाणार आहे. संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या या दिनाची उद्यासाठी थीम “थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट” अशी आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन,…

Read More

सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेचे कुडाळ येथील दोन दिवशीय उपोषण धरणे आंदोलनाचा शांततेत समारोप.

कुडाळ प्रतिनिधी नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे.त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने मंगळवार दिनांक 23.09.2025. आणि आज बुधवार दिनांक 24.09.2025 रोजी या दोन दिवशीय ओबीसी आणि आरक्षित समाज आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवानी लाक्षणीय उपस्थिती दर्शऊन सहभाग घेतला.आणि बुधवारी सायंकाळी 6 वाजता जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या…

Read More

You cannot copy content of this page