नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ.अर्चना अतुल बंगे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान

कुडाळ प्रतिनिधी
हुमरमळा वालावल करमळीवाडी येथील ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना अतुल बंगे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला
यावेळी माजी सरपंच श्री सुरेश वालावलकर पंचायत समिती माजी सदस्य श्री अतुल बंगे, उपसरपंच सौ रश्मी रमाकांत वालावलकर,मोहन वालावलकर,सुमन वालावलकर, किशोर वालावलकर,दीपक वालावलकर, आत्माराम वालावलकर, विजय वालावलकर,वामन वालावलकर, रमाकांत वालावलकर, विष्णू वालावलकर, उल्हास वालावलकर आदी उपस्थित होते
यावेळी प्रथमच नेरुर देऊळवाडा दक्षिण पंचायत समिती मतदारसंघातुन पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी सौ अर्चना अतुल बंगे यांनी कुलस्वामिनी मंदीर मध्ये श्रीफळ ठेवून दर्शन घेतले यानंतर आपल्याच वाडीतील उपसरपंच सौ रश्मी रमाकांत वालावलकर यांनी हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये चांगले कामं करत असल्यानेच सौ अर्चना अतुल बंगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
करमळीवाडी येथील ग्रामस्थांनी केली विकासाबाबत चर्चा
यावेळी श्री अतुल बंगे यांनी सांगितले अनेक विकासाची कामे प्रलंबित आहेत आणि ती पुर्ण करण्यासाठी तुमचेही सहकार्य अपेक्षित आहे असे सांगितले!
हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये आमच्या वाडीमध्ये सरपंच म्हणून सुरेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या म्हणून उर्मिला वालावलकर, आणि उपसरपंच म्हणून रश्मी वालावलकर ह्यांना संधी दील्याबद्दल अतुल बंगे यांचे विशेष आभार ग्रामस्थांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page