हीर्लोक तलाठी संतोष बांदेकर यांची किमान तीन वर्षे बदली करु नये!

हीर्लोक ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार सचिन पाटिल यांना निवेदन सादर..!

कुडाळ (प्रतिनिधी)
हीर्लोक गावातील लोकांशी आपुलकीने वागवुन महसुलच्या सर्व अडचणींवर मात करणारे तलाठी संतोष बांदेकर यांची किमान गावातुन तीन वर्षे तरी बदली करु नये अशा ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन आत्मा मिती सदस्य बाजीराव झेंडे आणि हीर्लोक उपसरपंच नरेंद्र राणे यांनी दीले
आज कुडाळ तहसीलदार सचिन पाटिल यांची शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन दिले यावेळी निवेदनात म्हटले आहे कि किती कालांतराने एक चांगला महसुल अधिकारी म्हणून संतोष बांदेकर हे आमच्या गावाला लाभले आहेत याचा आम्हा ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे तसेच महसुलची जी जी कामे असतात ती ईमाने ईतबारे करुन गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचुन महसुलच्या ज्या काही योजना आहेत त्या सांगतात अशा या गुणी तलाठी संतोष बांदेकर यांची किमान तीन वर्षे तरी गावातुन बदली करु नये अशा प्रकारचे निवेदन आज देण्यात आले
*कर्तव्य दक्ष महसुल अधिकारी संतोष बांदेकर*
यावेळी तहसीलदार सचिन पाटिल म्हणाले कुडाळ तालुक्यात मला माझा स्टाफ चांगलाच आहेच परंतु संतोष बांदेकर एक अतिशय हुशार महसुल अधिकारी म्हणून लाभला आहे त्याची बदली करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही श्री पाटील यांनी सांगितले
यावेळी शिवसेनेचे नेते श्री अतुल बंगे, कृषी आत्मा समितीचे बाजीराव झेंडे, हीर्लोक उपसरपंच श्री नरेंद्र राणे, शाम सावंत, समिर सावंत, दीपक परब आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page