कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील माड्याचीवाडी खालचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात प्रती वर्षाप्रमाणे बुधवार दि. २९ जुलै रोजी गुरूपौर्णीमा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात पहाटे ५.०० संकल्प, सकाळी ६.०० वा. गुरूमंत्र, सकाळी ८.०० स्वामीच्या मठात धार्मीक विधी, सकाळी ९.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी ११.०० वा. श्री श्री १०८ मंहंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांची पाद्यपूजा, दुपारी ११.३० वा. दहावी बारावी व योग विद्यार्थाचा गुणगौरव सोहळा, दुपारी १२.०० वा. सदगुरूचे प्रबोधन मार्गदर्शन, दुपारी १.०० वा. सदगुरू दर्शन सोहळा व अखंड महाप्रसाद, दुपारी २.३० वा.स स्वरसाई आरती मंडळ म्हापसा गोवा यांचा घुमट आरतीचा कार्यक्रम, सायंकाळी ४.०० वा. गोपाळकृष्ण रवळनाथ आरती मंडळ एकोशी यांचा घाट आरतीया कार्यक्रम, सायंकाळी ७.०० वा. स्वामीची नित्य आरती, सायंकाळी ७.३० वा. मोरेश्वर महीला फुगडी मंडळ नेरूर वाघचौडी यांचा पारंपारीक फुगडीचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. तरी भावीक भक्तगणानी या सोहळ्यास उपस्थित राहुन श्रीचे व सदगुरू माऊलीचे आशिर्वाद घ्यावेत असे आवाहन श्री सदगुरू भक्त सेवा न्यास या संस्थेचे अध्यक्ष श्री एकनाथ गावडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
कुडाळ-माड्याच्यावाडीत भक्तीमय वातावरणा साजरा होणार गुरूपौर्णीमा उत्सव
