ट्रकला मागून धडक मोटरसायकलस्वाराचा मृत्यू..!
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर लेमनग्रास हॉटेलसमोर संध्याकाळी ४.४५ च्या सुमारास रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला मागून मोटरसायकलची धडक बसून अपघात झाला. यात मोटरसायकस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. भूषण सुरेश कुडाळकर (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर कुडाळ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर ट्रक लेनलगत उभा होता. दरम्यानच्या वेळेस कुडाळच्या दिशेने येणा-या मोटरसायकलची ट्रकला मागून जोराची धडक बसून अपघात झाला. यात मोटरसायकलस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
