मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ लेमनग्रास हाॅटेल समोर अपघात;
ट्रकला मागून धडक मोटरसायकलस्वाराचा मृत्यू..! कुडाळ : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर लेमनग्रास हॉटेलसमोर संध्याकाळी ४.४५ च्या सुमारास रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला मागून मोटरसायकलची धडक बसून अपघात झाला. यात मोटरसायकस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. भूषण सुरेश कुडाळकर (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब…
