इन्सुली हायस्कूल मध्ये आ.दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
बांदा प्रतिनिधी येथील नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली हायस्कूलमध्ये माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवस सप्ताहाचे औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट आणि दप्तरे यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी,…
