हुमरमळा (वालावल) बिजोळेवाडी रस्त्यावर पुलाला भगदाड!वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय;सौ अर्चना बंगे

हुमरमळा (वालावल) बिजोळेवाडी रस्त्यावर पुलाला भगदाड! वाहतूक बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय – – – सौ अर्चना बंगे
कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल बिजोळेवाडी रस्त्यावर पुलाला भगदाड पडल्याने वाहातुक बंद झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने पहाणी करावी अशी मागणी वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी केली आहे
हुमरमळा वालावल बिजोळेवाडी ते करमळीवाडी गावधड वाडी ते आरकाचे पुल वालावल असा रस्ता आहे परंतु बिजोळेवाडी पुल बांधुन बरीच वर्षे झाली आता हे या पुलाला मोठे खड्डे पडले असुन सर्व पाईप फुटले आहेत असे सांगुन सौ बंगे म्हणाल्या सध्या ग्रामस्थांना जाण्या येण्याची कसरत करावी लागते तसेच फोरव्हिलर गाड्या रीक्षा जात नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे या कामाची त्वरित पहाणी सार्वजनिक बांधकाम विभाग (pwd) यांच्या अधिका-यांनी पहाणी करुन त्वरित कारवाई करावी अशी मागणी सौ बंगे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page