विशाल सेवा फाउंडेशन आयोजित आंबोली मान्सून 2026 मॅरेथॉन ची जय्यत तयारी सुरू..

सावंतवाडी प्रतिनिधी
तालुक्यातील आंबोली मान्सुन मॅरेथॉन ची जय्यत तयारी सह्याद्री ॲडव्हेंचर व रेस्क्यु टीम आंबोली-सांगेली व सायकलींग असोसीएशन आयोजित व विशाल सेवा फाउंडेशन प्रायोजित आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ ला उद्या सकाळी प्रारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. रविवार सकाळी ६.३० वा मॅरेथॉन चा शुभारंभ महाराष्ट्र भाजपा युवानेते व विशाल सेवा फाउंडेशन चे संस्थापक विशालजी परब यांच्या हस्ते झेंडा दाखवून होणार आहे. १८ कि. मि. १० कि. मि. व ५ कि. मि. अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे. जवळजवळ एक हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होण्याचा अंदाज असून आंबोलीत उद्या त्यानिमित्ताने पर्यटकांचा महापूर उसळणार आहे. पर्यटनाच्या वृद्धीसाठी व आजच्या धकाधकीच्या जिवनात आपले आरोग्य निरोगी राखण्यासाठी ही आंबोली मान्सुन मॅरेथॉन स्पर्धा निश्चितच उपयोगी ठरेल असा विश्वास विशालजी परब यांनी व्यक्त केला आहे. स्वतः विशाल परब व सौ. वेदिका परब या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे विशाल परब यांनी सांगितले. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे व या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही विशाल परब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page