वेंगुर्ला प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शनिवार, १३ जून रोजी वेंगुर्ला येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. वेंगुर्ला तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ. वसुधा मोरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना कोकणातील रोजगार तसेच कमी मार्क मिळाल्याने विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींमधून विद्यार्थ्यांनी कसे यशस्वी करिअरकडे जावे याबद्दल सांगितले. यावेळी बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य गोस्वामी सर, जिल्हा संयोजक विनीत परब तसेच कार्यक्रम प्रमुख अथर्व परब उपस्थित होते.
