कुडाळ-मालवणचा विकास पुन्हा रुळावर आणणार! हळदीचे नेरूर पुलाच्या भूमिपूजनावेळी आम.निलेश राणेंची ग्वाही

कुडाळ प्रतिनिधी
हळदीचे नेरूर गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या वर्षभरात म्हणजेच ८ सप्टेंबर २०२७ पर्यंत हा पूल पूर्णत्वास येईल आणि येथील नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे आश्वासन आज आमदार निलेश राणे यांनी हळदीचे नेरुर येथे पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, दिलीप सावंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, देवेंद्र नाईक, निवृत पोलीस अधिकारी सतीश कविटकर, राजा धुरी आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की, एक वर्षाच्या आतमध्येच हा पूल पूर्ण होईल तसा पाठपुरावा केला जाईल. ८ सप्टेंबर २०२७ या दिवशी या पुलाची” कंपलीशन डेट” आहे त्यामुळे या पुलाचे काम कसे वर्षभरात पूर्ण होईल यासाठी मी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नेहमीच पाठपुरावा करणार आहे. मात्र, ठेकेदार यांनी आताच स्पष्ट केले आहे की, मार्च

महिन्यापर्यंत हा पूल आपण पूर्णत्वास येईल. मात्र, या पुलाचे काम दर्जेदार व्हावे हीच माझी अपेक्षा आहे.

या पुलाच्या कामासाठी स्थानिक ग्रामस्थ दिलीप सावंत यांनी माझ्याकडे नेहमीच पाठपुरावा केला. त्यामुळेच आज या पुलाचे कामाचे भूमिपूजन होत आहे. मी ज्यावेळी आमदार झालो त्यावेळी ज्या ज्यावेळी मला दिलीप सावंत भेटायचे त्यावेळी हळदीच्या नेरुर पुलाचा विषय माझ्या डोक्यात येत असे. त्यांचा जरी फोन आला तरी हळदीच्या नेरूर पुलासाठी असणार असे माझ्या डोक्यात येई.

मागील १० वर्षात येथील विकासकामे रखडली

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की, आज अनेक विकासकामे या मतदारसंघांमध्ये होणे आवश्यक आहेत. अनेक पुलांची कामे मागील १० वर्षात रखडली आहेत. मला ही कामे पूर्ण करायची आहेत. कारण मला लोकांनी काम करण्यासाठीच निवडून दिले असून टीका करण्यासाठी नाही. हा ५ कोटींचा पूल पूर्ण करून या लगतचा जो रस्ता आहे तो सुद्धा पूर्ण करण्याचा माझा मानस आहे.

| मागच्या १० वर्षात येते काम का झाले नाही? हे जर समोरचे आले तर त्यांना विचारा !

या मतदारसंघांमध्ये अनेक कामे आपल्याला करावयाची आहेत. या पुलाचे काम झाले म्हणजे गावातील सर्व कामे झाली असे नाही. हा मतदारसंघ १० वर्षात विकासापासून वंचित राहिला. महाराष्ट्राच्या नकाशावर २८८ मतदारसंघ आहेत. मात्र, या नकाशावरून कुडाळ-मालवण मतदारसंघ मागील दहा वर्षात हरवला गेला. हा मतदारसंघ पुन्हा

जिवंत करण्याचे काम आम्ही २०२४ पासून सुरू केले आहे. मतदारसंघाचा विकास काय असतो हे दाखवायची माझी धडपड सुरू आहे. मी फक्त कर्तव्य बजावतोय मी कोणावरही उपकार करत नाही. उपकार हा शब्द तुमच्या शब्दकोशातून बाहेर काढून टाका. माझे काम आहे ते मला केलेच पाहिजे. मागच्या १० वर्षात येते काम का झाले नाही? हे जर समोरचे आले तर त्यांना विचारा, असा सल्ला आमदार निलेश राणे यांनी उपस्थित नागरिकांना दिला.

| माझ्याकडे दीड वर्षातील हिशेब मागत मागतायत त्यांचे आव्हान स्वीकारले: निलेश राणे

यावेळी आमदार निलेश राणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पुढील दीड वर्षांमध्ये निलेश राणे या मतदारसंघात काय काय करतो हे तुम्ही नक्की पहा ! मी कुणावर टीका करणार नाही, पण माझ्यावर दररोज टीका होते. मिटींगला उशिरा पोचलो तरी तरी टीका होते. कारण माझ्या लक्षात आले आहे की, काही लोक हे रिकामटेकडे आहेत. त्यांना काहीच काम नाही, ज्यांनी १० वर्षे काही काम केली नाहीत ते आता माझ्याकडे दीड वर्षातील हिशेब मागत आहेत. मी त्यांचे आव्हान स्वीकारले आहे, असे आमदार निलेश राणे म्हणाले. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मी जे काम करेन ते कोणीही करून दाखविले तर मी माझ्या हातातील शस्त्रे टाकायला तयार आहे. माझी स्पर्धा ही बौद्धिक स्तरावर व्हावी, मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडत असताना बघत नाही की मी कठल्या भागावर बसलो आहे कोणासमोर

गुडघे टेकण्याची भाषा मी बघत नाही. राणे साहेबांनी मला आधीच सांगितले आहे की, तुझा मतदारसंघ पहिला तू कुठल्या बाकावर बसतोस ते महत्त्वाचे नाही.

माझी स्पर्धा कोणाशीच नाही. माझी स्पर्धा कोणाशीच नाही. मी २५? वर्षे इथे टिकायला आलो नाही. जी मला लोकांनी पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. ज्या मतदारसंघात माझ्या वडिलांचा पराभव झाला, त्याच मतदारसंघात मला लोकांनी निवडून दिले. या जिल्ह्यातूनच माझे वडील आता खासदार आहेत. माझा भाऊ पालकमंत्री आहे. हे उपकार आम्ही कसे विसरायचे? राणे कुटुंबाला जे येथील लोकांनी दिले ते आम्ही उभ्या आयुष्यात फेडू शकत नाही.

टाळंबा प्रकल्प होणार नाही

टाळंबा प्रकल्प होणार नाही हे नक्की, मी जिवंत असेपर्यंत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी उपस्थितीतांना दिले.

२०१४ पासून मी या भागात विकास शोधत आहे. या भागामध्ये मी उच्च दर्जाचे काम करणार आहे. त्यामुळे माझ्या नंतर जो येणारा असेल त्यांना समजेल की येथे किती काम झाले? मागील १० वर्षात कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघाचा विकास होत होता. मात्र, कुडाळ-मालवणमध्ये विकास होत नव्हता. अधिकारी दखलच घेत नव्हते. कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी जो २०० कोटींचा

निधी येत होता ते कधी आपल्याला मिळायचे नाहीत. जिल्हा नियोजनच्या आराखड्यामध्ये आपल्या मतदारसंघाला ३५! कोटी रुपये सुद्धा मिळायचे नाहीत. आज पुन्हा कुडाळ-मालवण मतदारसंघाचा आराखडा हजार-बाराशे कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. याच्यावर आपण थांबणार नाही हा आराखडा किमान ५ हजार कोटी रुपयांपर्यंत गेला पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले. विकास हा फक्त महायुतीच्या सरकारमध्येच होऊ शकतो. आता आपल्या जिल्हा परिषदेचे काम सुद्धा पारदर्शकपणे सुरू आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे यावेळी सिंधुदुर्ग आले होते त्यांनी सुद्धा ५० कोटींचा निधी जिल्हा परिषदेसाठी देऊ असे आश्वासन दिले होते. तो ५० कोटींचा निधी लवकरात लवकर आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page