भोसले नॉलेज सिटी येथे ‘शिवजयंती ‘ उत्साहात
पोवाडे,नामघोष व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण चैतन्यमय….. सावंतवाडी प्रतिनिधी भोसले नॉलेज सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत संस्थेच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले. त्यानंतर कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षा ऍडव्होकेट अस्मिता सावंतभोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक,…
