विशाल परब यांच्या जनसेवेच्या माध्यमातून तळकोकणात निर्माण केली वेगळी ओळख.!
संघर्षातून यशस्वी युवा नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! सिंधुदुर्ग प्रतिनिधी नावात विशाल..लोकांच्या मनात असा विशाल परब कुडाळ तालुक्यातील वाडोस या गावातून आपल्या कार्यातून भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते आणि यशस्वी उद्योजक विशाल प्रभाकर परब यांचा वाढदिवस त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि सेवाभावी कार्याचा आढावा घेण्याची संधी ठरत आहे. माणगाव खोऱ्यातील वाडोस या छोट्याशा गावात जन्मलेल्या विशाल परब…
हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा
भाजपा युवा नेते तथा महाराष्ट्रातील युवा नेतृत्व श्री.विशाल परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते
दोडामार्गात महाआरोग्य शिबिराचा भव्य शुभारंभ; विशाल परब यांच्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत
वाढदिवस समाजसेवेतून साजरा;शिबिराला नागरिकांची मोठी गर्दी..! दोडामार्ग : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी विचारांतून, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि राज्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रेरणेने भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा,…
व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांची हेलसकर कुटुंबीयांना सांत्वनपर भेट
सेलू, जिल्हा परभणी येथील व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे कार्याध्यक्ष बाबासाहेब हेलसकर यांच्या दुर्दैवी निधनाने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारितेच्या हितासाठी ते संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी हेलसकर कुटुंबीयांची नुकतीच सांत्वनपर…
कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम..
वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना फोटो *शिवापूर, ता. कुडाळ यावर्षी कमी पावसामुळे कोकणातही पाणी साठा वाढविणे ,भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कच्चे बंधारे बांधण्यात येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला ओहळ ,नाले आणि नद्यांवर कच्चे बंधारे बांधण्याचे आवाहन केल्यानंतर गावोगावी अच्छे बंधारे बांधले जात आहे शिवापुर सह्याद्री पायथ्याशी असलेल्या शिवापूर गावातही…
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘कृषकव्हेंचर’चे बांद्यात नवे पाऊल; विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन
शेतमालाला योग्य बाजारपेठ, रास्त दर आणि आधुनिक कृषी मार्गदर्शनावर भर! बांदा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल, घामाला समृद्धीचे फळ आणि कृषी उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळाली, तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने बळ मिळेल. शेतकऱ्यांच्या हाताला उत्पादनाचे सामर्थ्य आहे; मात्र त्या उत्पादनाला योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी सक्षम बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह मार्गदर्शनाची जोड आवश्यक आहे….
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा स्तुत्य उपक्रम : वनराई बंधाऱ्यांसाठी २५ हजार पिशव्यांचे वितरण
सिंधुनगरी प्रतिनीधी जिल्ह्यात ठिकठिकाणी जलसंधारणासाठी वनराई बंधाऱ्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून, या कामाला गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वनराई बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या सुमारे २५ हजार पिशव्या बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडे सुपूर्त केल्या. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा…
२०० हून अधिक जणांच्या उपस्थितीत सावंतवाडीत स्त्रीशक्तीचा जागर; सेवाव्रती महिलांचा सन्मान
सावंतवाडी : समाजाच्या प्रगतीचा रथ पुढे नेण्यासाठी काही हात अहोरात्र झटत असतात, तर काही कर्तृत्ववान स्त्रिया आपल्या सेवाभावाने समाजजीवनात माणुसकीचा सुगंध दरवळवत असतात. कधी आरोग्यसेवेच्या माध्यमातून जीवनाला संजीवनी देणारी, कधी माता-बालकांच्या आरोग्याची काळजी घेणारी, तर कधी गावाच्या विकासासाठी प्रशासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा बनणारी ही स्त्रीशक्ती म्हणजे समाजाच्या परिवर्तनाची खरी शिल्पकार! अशाच सेवाव्रती, कर्तृत्ववान आणि…
मळेवाड येथे पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत व उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांच्या हस्ते उद्घाटन.!
युवा नेते विशाल परब यांचे भव्य आयोजनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद.! ‘सेवेचा संकल्प, आरोग्याचा ध्यास!’ हा संदेश घेऊन मळेवाड येथे आयोजित पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र…
खोपोली येथील व्हाईस ऑफ मीडियाच्या कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्ग अव्वल..!
दोडामार्गच्या टीमच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी.! खोपोली प्रतिनिधी पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीसोबतच ज्ञान,अभ्यास आणि वैचारिक देवाणघेवाणीला चालना देणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाच्या कोकण विभागीय कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले. विविध विषयांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत सिंधुदुर्गच्या टीमने प्रथम क्रमांक मिळविला. या यशामुळे कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्गच्या पत्रकारांनी आपल्या ज्ञानाची आणि संघभावनेची प्रभावी छाप उमटवली. खोपोली…
