आमदार वैभव नाईक आणि महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष,नगरसेवक यांचा पुढाकार!
कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीचे सफाई कामगार हे कुडाळ शहरातील स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेत असताना त्यांना सुध्दा विश्रांती म्हणुन देवदर्शन घडावे याच संकल्पनेतुन पंढरपूर, अक्कलकोट,शिर्डी, तुळजाभवानी असा देव दर्शन योग घडवुन आणत पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतील ही संकल्पना महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या कडे सांगुन सहकार्य करुन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या संकल्पनेतून हे सफाई कामगार देवदर्शन घेऊ शकले आज या देवदर्शन सहलीचा शुभारंभ शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी श्रीफळ वाढवून केला, यावेळी नगरसेवक उदय मांजरेकर ,विलास मुणगेकर,दीलीप कदम,सुनिता कुडाळकर, रमेश देवलकर,सतिश जाधव,राजन कदम,धोंडी बिबवणेकर, संतोष नेरूरकर,सुवर्णा जाधव,सुचिता जाधव,आरती धामापुरकर उपस्थित होते
