कुडाळ तालुक्यातील माणगाव परिसरातील डोंगरवाडी येथे एका घरगुती कुत्र्यावर सुरीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबी म्हाडेश्वर यांच्या घरातील पाळीव कुत्र्यावर त्यांच्या दोन चुलत भावांनी आणि त्यांच्या मुलांनी सुरीने वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कुत्र्याच्या पाठीवर गंभीर जखम झाली असून तो जखमी अवस्थेत आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. प्राणीप्रेमींनी अशा प्रकारच्या अमानुष कृत्याचा निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
घरगुती कुत्र्यावर सुरीने हल्ला; कुडाळ तालुक्यातील माणगाव डोंगरवाडीत संतापाची लाट
