सावंतवाडी प्रतिनिधी
नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद हे गेली अनेक दिवस रिक्त होते. इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन या नगरपरिषदेचा कार्यभार हाकला जात होता. मात्र आमदार श्री.दीपक केसरकर यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणार आहे . सावंतवाडी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने लोकांची फार मोठी गैरसोय होत होती. तसेच अनेक विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होत होता.
आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी पुढील दोन दिवसात नियुक्ती होणार असून सदर अधिकारी नगर परिषदेमध्ये रुजू होणार आहेत.
तसेच वेंगुर्ले नगर परिषदेला सुद्धा नवीन मुख्याधिकारी रुजू होणार आहेत.
गेली अनेक दिवस सावंतवाडी नगर परिषदेचे रिक्त असलेले मुख्याधिकारी पद पुढील दोन दिवसांमध्ये भरले जाणार:आमदार दीपक केसरकर.
