पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा.

जिल्हाधिकारी पाणथळ संरक्षण समितीचे अध्यक्ष असून देखील पिंगुळी पाझर तलाव पाणथळ क्षेत्रातील उल्लंघनाकडे दुर्लक्ष का करत आहेत मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल.

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील सार्वजनिक शासकीय पाझर तलावाला लागून नियमबाह्य रित्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असून सदर प्रकल्पाच्या नियमबाह्य कामांमुळे तलावातील पाणी भविष्यात दूषित होणार असून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पिंगुळी गावाच्या पिण्याच्या पाण्यावर फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर पाझर तलाव हा राष्ट्रीय वेटलँड ऐटलास मध्ये मॅच झालेला असून त्यानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तलाव संरक्षित आहे. असे असताना तलावाच्या बफरझोन आणि पाणलोट क्षेत्रामध्ये नियमांचे उल्लंघन करून आर्थिक बळाच्या जीवावर परवानगी दिल्याचे दिसून येत आहे. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत स्वतः ठीक ठिकाणी तात्पुरते कृत्रिम बंधारे बांधतानाचे फोटो रोज प्रसारित करत आहेत तर दुसरीकडे सदर निसर्गाचे देणं असलेला कायमस्वरूपी पाझर तलावाच्या वेटलँड समितीचे अध्यक्ष असून देखील सदरच्या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत. तसेच सदर तलाव ज्यांच्या अखत्यारित येतो त्या लघु पाटबंधारे विभागाकडून देखील या गंभीर बाबीकडे जाणून बुजून डोळे झाक करण्यात येत असल्याचा आरोप मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला असून
मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वात आंदोलनात सहभागी होणार असून ग्रामस्थांनी पुकारलेल्या उद्याच्या उपोषण आंदोलनास मनसेचा पाठींबा असल्याचे
या पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page