दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील श्री थोरला देव युवा मित्र गोठोस मांडेशेतवाडी मंडळाच्यावतीने श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या २ मे रोजी हे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजल्यापासून तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, रात्री ८ वाजता श्री देवी भावई समई नृत्य गोठोस मांडेशेतवाडी यांचा कार्यक्रम, तर त्यानंतर रंगणार खेळ पैठणीचा खेळ.या पैठणी खेळामध्ये एकूण ३ नंबर काढले जातील. तरी या सत्यनारायण महापुजेचा आणि पैठणीच्या खेळाचा आनंद लुटण्याचे आवाहन श्री थोरला देव युवा मित्र मंडळ गोठोस मांडेशेतवाडी यांच्यावतीने करण्यात आलं आहे..
श्री थोरला देव युवा मित्र मंडळ गोठोस येथे २ मे रोजी सत्यनारायण महापूजा
